नगर सहयाद्री टीम- ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ या लोकप्रिय कार्यक्रमात टेनिसपटू सानिया मिर्झासहभागी झाली होती. कपिल शर्माने सानिया मिर्झाला तिच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारला की,”मेरी कॉम’ च्या बायोपिकमध्ये प्रियंका चोप्राने काम केलं आहे.
परिणीती चोप्राने सायना नेहवालच्या भूमिकेला न्याय दिला होता. तर तुझ्या बायोपिकमध्ये तुला कोणाला पाहायला आवडेल?
कपिल शर्माच्या प्रश्नाचं मजेशीर अंदाजात उत्तर देत सानिया मिर्झा म्हणाली की, आपल्या देशात अनेक चांगले कलाकार आहेत. कोणीही काम केलं तरी चालेल. किंवा मी स्वत:देखील अभिनय करू शकते.
कपिल शर्माने पुढे सानियाला विचारलं की, तुझ्या बायोपिकमध्ये शाहरुख काम करत असेल तर त्याच्या अपोझिट अभिनय करायला तुला आवडेल का? या प्रश्नाचं उत्तर देत सानिया मिर्झा म्हणाली की,शाहरुख खान जर चित्रपटात काम करत असेल तर मला त्याच्यासोबत अभिनय करायला आवडेल.
शोएब मलिक आणि सना जावेद 19 जानेवारी 2024 रोजी लग्नबंधनात अडकले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना लग्नाची माहिती दिली. त्यानंतर सानिया मिर्झाने कन्फर्म केलं की काही महिन्यांपूर्वी शोएबपाहून ती विभक्त झाली आहे. सानिया मिर्झा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.