spot_img
आर्थिककाय सांगता! AC इतका स्वस्त मिळणार, 'रिलायन्स रिटेल' कंपनीचा काय आहे प्लॅन?

काय सांगता! AC इतका स्वस्त मिळणार, ‘रिलायन्स रिटेल’ कंपनीचा काय आहे प्लॅन?

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम
मुकेश अंबानी यांच्या व्यवसायावर सर्वांची नजर आहे. कारण कंपनी प्रत्येक बाबतीत फायदेशीर ठरते. जरी जिओच्या मदतीने अंबानी कुटुंबाने संपूर्ण बाजारपेठेचा कायापालट केला. आता बातमी अशी आहे की मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा लवकरच एसी, फ्रिज आणि टीव्हीची नवीन कंपनी लॉन्च करणार आहे.

रिलायन्स रिटेल ही भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीजची एक महत्त्वाची कंपनी आहे. मुकेश अंबानी यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये रिलायन्स रिटेलची जबाबदारी ईशा अंबानींकडे सोपवली, तेव्हापासून ही कंपनी चांगली कामगिरी करत आहे.

रिलायन्स रिटेलला आपला पोर्टफोलिओ वाढवायचा आहे आणि कंपनी लवकरच गृहोपयोगी वस्तूंच्या नवीन श्रेणीत प्रवेश करणार आहे.एका वृत्त वाहिनीच्या माहितीनुसार, रिलायन्स रिटेल लवकरच स्मार्ट टीव्ही, एसी आणि इतर गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

Wyzr च्या मदतीनं, ईशा अंबानीची रिलायन्स रिटेल इतर ब्रँडसाठी समस्या निर्माण करू शकते. या ब्रँड अंतर्गत कंपनी टीव्ही, फ्रिज, एसी, एलईडीचे उत्पादन करू शकते. भारतात एसीची बाजारपेठ खूप मोठी आहे, छोट्या ब्रँडपासून ते अनेक मोठे आणि प्रसिद्ध ब्रँड्स येथे आहेत. यामध्ये O’general, carrier, Samsung, LG आणि Blue Star सारख्या ब्रँडचा समावेश आहे. रिलायन्स एसी भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतरच कंपनीची पुढील रणनीती स्पष्ट होईल.

Wyzr च्या कूलरबद्दल बोलायचे झाले तर तो खरेदी करण्यासाठी तुम्हाला जवळपास 12 हजार रुपये खर्च करावे लागतील. कंपनीने अनेक कूलर लाँच केले आहे. 11,490 रुपयांपासून 16,990 रुपयांपर्यंतचे कुलर होते. फायबर आणि प्लॅस्टिक बॉडीसह येणा-या या कुलर्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी शांत आहेत आणि अजिबात आवाज करत नाहीत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...