spot_img
ब्रेकिंगहवामान खात्याचा अंदाज खरा ठरला!! राज्यात 'अवकाळी' पावसाचा तडाखा? पुन्हा 'या' जिल्ह्यांना...

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला!! राज्यात ‘अवकाळी’ पावसाचा तडाखा? पुन्हा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

spot_img

पुणे-। नगर सहयाद्री
राज्यावर अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे संकट कायम आहे. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढणार आहे.

सौराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वार्‍यांची स्थिती आहे. त्यापासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी राज्यात विजांचा गडगडाट आणि ढगांच्या कडकडाटासह तुफान पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर, परभणी, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पाऊस पडला. तर तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली.

वर्धा आणि वाशिममध्ये ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने पुढील ४८ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबदारी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

अहमदनगरमध्ये पावसाची शक्यता
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी नगर जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाने हजेरी लावली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाप-लेकाच्या नात्यांचा भयानक शेवट! मुलाने जन्मदात्या बापाला एका क्षणात संपवलं..

Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच...

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील युवा लोकांना मिळणार खुशखबर?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी...

विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी जनसेवा युवा मंचाचे काम – डॉ. विखे पाटील

  शिर्डीत युवकांचा भव्य मेळावा संपन्न शिर्डी : जनसेवा युवा मंच आपले कुटूंब आहे. जात आणि...