अहमदनगर। नगर सहयाद्री
गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणाला तोफखाना पोलिसांनी तारकपूर स्थानकांसमोर पकडले. विशाल पांडुरंग बोरूडे (वय २५, रा. वारूळाचा मारूती, नालेगाव, मूळ रा. वाघवाडी, लोहगाव, ता. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तारकपूर बस स्थानकाबाहेर रस्त्यावर एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी तारकपूर बस स्थानकाबाहेरील बाजूला सापळा लावला.
काही वेळातच रस्त्याच्या बाजूस आलेल्या एका तरुणाची हालचाल संशयास्पद असल्याने सदर तरुणाला ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव विशाल पांडुरंग बोरूडे असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.