नगर सहयाद्री वेब टीम
आजकाल कर्ज घेणाऱ्यांची संख्या तेजीने वाढत आहे. छोट्या-मोठ्या गरजांसाठी अनेक जण कर्ज घेतात. पूर्वी कर्ज घेणे समाजात योग्य मानत नव्हते. पण आता ही संकल्पना मागे पडली आहे. गरजा पुर्ततेसाठी अनेक जण कर्ज घेतात. पण कर्ज घेतले तर ईएमआय भरण्याची चिंता सतावते. ईएमआय थकला तर मग त्यावर दंडाचा भरणा करावा लागतो. याप्रक्रियेत कधी कधी कर्जदार गुरफुटून जातो. तुम्हाला अशी झंझट नको असेल आणि अधिक व्याजाचा ताप पण नको असेल तर सोन्यावरील कर्ज हा सर्वात चांगला पर्याय आहे.
लोक आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या गरजांसाठी कर्जाची मदत घेतात. मुलांच्या शिक्षणापासून ते घर बांधण्यापर्यंत किंवा व्यवसाय करण्यापर्यंत लोक कर्जावर अवलंबून राहतात. अशा परिस्थितीत, सर्वात सोपे कर्ज म्हणजे सुवर्ण कर्ज. देशातील टॉप 6 बँकांमध्ये गोल्ड लोनवर किती व्याज आकारले जाते हे तुम्हाला माहिती आहे का?
6 बँकांमध्ये सुवर्ण कर्जावरील काय आहे व्याजदर ?
स्टेट ऑफ इंडिया – 8.65%
पंजाब नेशनल बॅंक- 9.25%
बँक ऑफ इंडिया- 9.40%
एच डी एफ सी- 11.98%
आय सी आय सी आय – 14.65%
ऍक्सीस बँक- 17%
काय आहे गोल्ड लोन
सध्याच्या काळात सोन्यावरील कर्ज हा चांगला पर्याय आहे. मुलांचे शिक्षण असो वा लग्न अथवा उपचारावरील खर्च सर्वांसाठी सोन्यावरील कर्ज हा चांगला पर्याय समोर आला आहे. हे कर्ज इतर कर्जांपेक्षा अधिक सुरक्षित मानण्यात येते. बँका अथवा वित्तीय संस्था तुमच्याकडील सोने, सोन्याचे तुकडे, दागिने, सोन्याची नाणे तारण ठेवते. त्या मोबदल्यात बँका कर्ज देतात. कर्जाची परतफेड झाल्यावर वित्तीय संस्था सोने परत करतात.