नगर सहयाद्री टीम-
Vivo स्मार्टफोन उत्पादक कंपनीने भारतीय बाजारात नवीन बजेटमध्ये Vivo T3X 5G लॉन्च करणार आहे. आता या फोनच्या लॉन्चिंगची डेडही निश्चित झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रीमियम डिझाइनसह पॉवरफुल कॅमेरा असेल आणि याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल.
Vivo T3X 5G 17 एप्रिल रोजी भारतीय बाजारात लॉन्च केला जाणार आहे. फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केला असून कंपनीच्या वेबसाइटशिवाय, ग्राहक हा फोन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर देखील खरेदी करू शकतील. नवीन फोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये येणारअसून\ ग्राहकांना ऑफरचा लाभ देखील मिळणार आहे.
Vivo च्या नवीन स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह मोठा 6.72-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. अँड्रॉइड 14 वर आधारित सॉफ्टवेअरशिवाय या फोनमध्ये IP64 रेटिंग देण्यात येणार आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर व्यतिरिक्त, Vivo T3X 5G 8GB पर्यंत रॅम मिळू शकतो.