अहमदनगर / नगर सह्याद्री
अहमदनगर मतदारसंघात चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये खासदार नीलेश लंके यांनी यांनी भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांचा तब्बल २९ हजार मतांनी पराभव केला. नगरमध्ये विखे पाटील यांचा झालेला पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात खासदार नीलेश लंके यांना १ लाख ३० हजार ४४० तर सुजय विखे पाटील यांना ९२ हजार ३४० मते मिळाली.
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात लंके यांना तब्बल ३८ हजार १०० मतांचे मताधिक्य मिळाले. होमग्राऊंडवर मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर विजयश्री खेचून आणला.
पारनेर खालोखाल श्रीगोंद्यात लंके यांना मताधिक्य मिळाले. श्रीगोंद्यात ३२ हजारांचे तर कर्जत जामखेडमध्ये ८ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले.
पारनेर-नगर विधानसभा मतदासंघाचे गावनिहाय उमेदवारांना पडलेले मते नगर सह्याद्रीच्या हाती आली आहेत. ती पुढील प्रमाणे……