अहमदनगर । नगर सह्यादी
शहरातील एका ‘धक्कादायक’ घटनेचा उलघडा झाल्याची बातमी समोर आली आहे. जन्मदात्या बापाने गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकून देत मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आल्याने बापाच्या कृत्याचे भाडं फुटलं.
अखेर पोलिसांनी बापासह मृताच्या भावाला अटक केली आहे. गणेश अशोक एकाडे (रा. बुरुडगाव, नगर) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी अशोक एकाडे व त्याच्या दुसऱ्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी: अशोक एकाडे यांनी मुलगा गणेश बेपत्ता असल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केली होती.याप्रकरणी पोलिसांनी तपास देखील सुरु केला होता. परंतु, मुलगा गणेश मिळून आला नाही. पोलिसांना फिर्यादी अशोक एकाडे याच्यावर संशय होता. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी फिर्यादीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने आपणच मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तारीने बांधून दुसऱ्या मुलाच्या मदतीने विहिरीत ढकलून दिल्याची कबुली दिली आहे.