अहमदगर । नगर सहयाद्री
जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर दोघा नातेवाईकांनी मिळून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात अपहरण, अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: राहुरी तालुक्यातील एका गावात पीडित मुलीच्या घरी दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत तीचे नातेवाईक ऋषिकेश पांडुरंग धोंडे (वय २५) व सतीश विठ्ठल टकले (दोघे रा. आष्टी जि. बीड), हे दोघे येत होते.
या दोघांनी सन २०१६ ते एप्रिल २०२४ या दरम्यान मुलीवर लैंगिक अत्याचार करत मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल केले. तसेच गावठी पिस्टलचा धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी विविध ठिकाणी अत्याचार केले.
नंतर ऋषिकेश धोंडे याने मुलीचे अपहरण करून तिला पुणे येथील आळंदी येथे घेऊन जाऊन तिच्याशी बळजबरीने लग्न केले. त्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला फाशी देण्याचा तसेच विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत आहे.