spot_img
अहमदनगरपारनेरमध्ये तुफान राडा! खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांवर प्राणघातक हल्ला

पारनेरमध्ये तुफान राडा! खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांवर प्राणघातक हल्ला

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
पारनेर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेच्या निकालाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशीच सुजय विखे समर्थक आणि निलेश लंके समर्थक यांच्यामध्ये तुफान राडा झाला. यावेळी निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पारनेरमध्ये जोरदार राडा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. नगर दक्षिण लोकसभेचे विजयी उमेदवार निलेश लंके आणि प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाले.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने पारनेर शहरात दोन गटात राडा झाला.दरम्यान खासदार निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्या गाडीची तोड-फोड करत आठ ते नऊ जणांनी हल्ला केला. या हल्लात राहुल झावरे झावरे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील युवा लोकांना मिळणार खुशखबर?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी...

विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी जनसेवा युवा मंचाचे काम – डॉ. विखे पाटील

  शिर्डीत युवकांचा भव्य मेळावा संपन्न शिर्डी : जनसेवा युवा मंच आपले कुटूंब आहे. जात आणि...

गुन्ह्याचा छडा लागला! जीपचालकाने २८ वर्षांच्या तरुणाला संपवल..; पुन्हा जिल्ह्यात काय घडलं..

Ahmednagar Crime News: छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाण्यासाठी एका जीपचालकाने नांदेड येथील व्यक्तीला...