अहमदनगर । नगरसहयाद्री
जिल्ह्यातील कोपरगाव शहराचा वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. रात्रंदिवस केव्हाही वीज गायब होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. याविरोधात मंगळवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विजेच्या लपंडावामुळे बंद पडलेल्या वस्तू महावितरण कार्यालयासमोर आणून फोडल्या. यापुढे वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘खळखट्ट्याक’ करू, असा इशारा देण्यात आला.
कोपरगाव शहरामध्ये सध्या दिवसा आणि रात्री कधीही वीज गायब होत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढला आहे. पावसाने लाइन ट्रिपिंग झाल्याची कारणे वारंवार महावितरणकडून दिली जातात. एकीकडे वीज बिलामध्ये भरमसाठ वाढ केली जात आहे, तर दुसरीकडे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत. विजेचा कारभार सुरळीत व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण
आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अनिल गाडे, हिंदुसम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे, तालुका संघटक नवनाथ मोहिते, कामगार सेना तालुकाध्यक्ष संजय जाधव, विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष अनिल सुपेकर, अजिंक्य काकडे, सुरेश सुपेकर, अभी पवार किरण आवारे, रोहन पवार, संज्ञ सुपेकर, बल्ली पाटोळे, प्रतीक त्रिभुवन आदींसह मनसे सैनिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.
सेनेकडून आठ दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. विजेचा कारभार सुधारावा, अशी अपेक्षा निवेदनात करण्यात आली होती. मात्र, महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलीही सुधारणा केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहाराध्य सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत टीव्ही व ट्यूबलाइट फोडून वीज वितरण कार्यालयाच्या कामाचा निषेध व्यक्त केला. यापुढे वीजपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास ‘खळखट्ट्याक’ होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.