spot_img
अहमदनगरपंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त 'या' रस्त्यावरील वाहतकीत बदल

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ‘या’ रस्त्यावरील वाहतकीत बदल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. ७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर दौर्‍यावर आहेत. नगर शहरामध्ये संत निरंकारी भवन जवळील हरेर मैदानावर प्रचार सभा होणार आहे. यासाठी जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातुन मोठया प्रमाणात नागरीक येणार आहेत. नगर शहरात मोठया प्रमाणात वाहनांची गर्दी होवुन वाहतुक कोंडी होण्याची शयता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी दोन वाजूपासून रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

अहमदनगर शहरातुन पुणे, मुंबई, विदर्भ, मराठवाडा आदी ठिकाणांना जोडणारे महामार्ग जात असल्यामुळे या महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. वाहतुकीमुळे पंतप्रधान यांचा वाहनताफा सभेच्या ठिकाणी येण्यास अडचणी निर्माण होवून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होवू नये तसेच सभेसाठी येणार्‍या नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागु नये याकरिता मंगळवारी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

पाथर्डीकडून अहमदनगर मागेर्र् सोलापुर, दौंड, पुणे, मुंबई, मनमाड, व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतूक व आवश्यकतेनुसार हलके वाहनांकरीता पर्यायी मार्ग- चांदबीबी महाल सारोळा बद्दी जामखेड रोड, निंबोडी मुष्ठी चौक, वाळुंज बायपास, अरणगाव बायपास, केडगाव बायपास – विळद बायपास शेंडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील.

बेल्हेश्वर चोक, महात्मा फुले चौक, नागरदेवळे बुन्हाणनगर वारुळवाडी गजराजनगर चौक मार्गे. सोलापुर कडून अहमदनगर मार्गे दौंड, पुणे, मुंबई, मनमाड, व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतुक व आवश्यकतेनुसार हलके वाहनांकरीता पर्यायी मार्ग. वाळुंज, अरणगाव, केडगाव, विळद, शेंडी बायपास मार्गे. दौंडकडून अहमदनगर मार्गे पुणे, मुंबई, मनमाड, व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतुक व आवश्यकतेनुसार हलके वाहनांकरीता पर्यायी मार्ग. त्यांना अरणगाव, केडगाव, विळद, शेंडी बायपास मार्गे जावे लागेल.

पुणे / कल्याण कडुन अहमदनगर मार्ग मनमाड, छत्रपती संभाजीनगरकडे तसेच सोलापुर, जामखेड, पाथर्डीकडे जाणारे जाणार्‍या वाहतुकीला मार्ग. केडगाव, विळद, शेंडी बायपास मार्गे तसेच केडगाव, अरणगाव, वाळुंज, मुष्ठी चौक जामखेड रोड सारोळा बद्दी चांदबीबी महाल मार्ग इच्छित स्थळी जातील.

मनमाड / छत्रपती संभाजीनगर कडून कल्याण, पुणे, दौड, सोलापुर, जामखेडकडे जाण्यासाठी शेंडी बायपास दूध डेअरी, विळद, केडगाव, अरणगाव, वाळुंज, मुष्ठी चौक- जामखेड रोड सारोळा बद्दी चांदबीबी महाल मार्गे जावे लागेल.

पारीजात कॉर्नर चौक या ठिकाणाहुन बीएसएनल कार्यालयाकडे जाणारे रोडवर, आनंद विदयालयाचे बाजूचे रस्त्यावरुन संत निरंकारी भवनाचे मोकळया जागेकडे जाण्यास, नुपुर इस्टेट एजन्सीपासून निरंकारी भवनाकडे जाण्यास, रेणुका माता मंदिरपासून जॉगिंग ट्रॅककडे जाण्यास, न्यू सिध कॉर्नरपासून जॉगिंग ट्रॅककडे जाण्यास, गंगा उद्यानकडून निरंकार भवन मैदानाकडे जाण्यास, एलआयसी कॉलनीकडून मैदानाकडे जाण्यास, तारकपूर रोडवरुन निरंकारी भवनाकडे जाण्यास, गंगा उद्यानापासून पंकज कॉलनीकडे जाण्यास सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या आदेशाचे पालन करुन नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक ओला यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इच्छुक अर्धाडझन तरीही श्रीगोंदेकरांमध्ये ‌‘सेटलमेंटचं सेंटीमेंट‌’

बबनराव पाचपुते विरोधकांमध्ये ‌‘भलतीच‌’ स्पर्धा | दबावतंत्रात टेंडर वाढवून घेतलं जात असल्याची जाहीर चर्चा...

नगरकरांना खुशखबर; आमदार संग्राम जगताप यांना नवरात्रात देवी पावली, २० कोटी मंजूर…

सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार...; खोलीकरण व रुंदीकरणासाठी २० कोटी मंजूर अहमदनगर | नगर...

शहर पुन्हा हादरलं! छत्तीसगडच्या अमनला नगरात संपवल; कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- बिगारी काम करणार्‍या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून...

आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, तुळजाभवानी माताकी जय…!; केडगाव, बुर्‍हाणनगरला देवीचा जागर

अहमदनगर । नगर सहयाद्री:- बुर्‍हाणनगर ता.नगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात गुरवारी सकाळी नवरात्रौत्सवानिमित्त...