spot_img
आर्थिककामगार दिनापासून बदलणार हे नियम, जाणून घ्या सविस्तर..

कामगार दिनापासून बदलणार हे नियम, जाणून घ्या सविस्तर..

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम-
मे महिना सुरू होण्यास २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासून नियमांमध्ये काही बदल केले जातात. त्याचा फटका सर्वसामान्यांना नागरिकांना नक्कीच बसत असतो. यामध्ये बँकिंगपासून ते एलपीजी सिलिंडरपर्यंतच्या सर्व बदलांचा समावेश असतो.

एलपीजी सिलेंडरची किंमत
एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती सरकार दर महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहीर करतात. यामध्ये 14 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा समावेश आहे. एप्रिलच्या सुरुवातीला 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत सुमारे 30 रुपयांनी कमी झाली होती. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

HDFC बँक FD ची अंतिम मुदत
तुम्ही 10 मे 2024 पर्यंत HDFC बँकेच्या सिनियर सिटीझन केअर FD मध्ये गुंतवणूक करू शकता. या एफडीमध्ये फक्त ज्येष्ठ नागरिकच गुंतवणूक करू शकतात. या एफडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सामान्य व्याजदरांच्या तुलनेत अतिरिक्त व्याज दिले जात आहे.

आयसीआयसीआय आणि येस बँकेने शुल्क बदलले
ICICI बँकेने चेकबुक, IMPS, ECS/NACH डेबिट रिटर्न, स्टॉप पेमेंट शुल्क आणि बरेच काही यासह काही सेवांचे बचत खाते सेवा शुल्क सुधारित केले आहे. ICICI बँकेच्या वेबसाइटनुसार, हे बदल 1 मे 2024 पासून लागू होतील.

क्रेडीट कार्ड
पुढील महिन्याच्या १ तारखेपासून क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल पेमेंटवर बँका १% अतिरिक्त शुल्क आकारतील. एस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेने 1 मे 2024 पासून त्यांच्या क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल पेमेंटवर अतिरिक्त 1 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...