spot_img
अहमदनगरसावेडीत 'धक्कादायक' प्रकार! बांधकाम व्यावसायिकाला..

सावेडीत ‘धक्कादायक’ प्रकार! बांधकाम व्यावसायिकाला..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

एअरलाईन मध्ये टिकीट ब्लॉकींगसाठी गुंतवणूक करून त्या बदल्यात चांगला फायदा करून देण्याचे अमिष दाखवत बांधकाम व्यावसायिकाची तब्बल दोन कोटी २१ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १२ डिसेंबर २०२२ ते १ ऑटोबर २०२३ दरम्यान घडला.

अर्ज चौकशीनंतर रविवारी (दि. ३) तोफखाना पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात अशाच प्रकारचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यातील संशयित आरोपींविरोधात पुन्हा गुन्हा दाखल झाला आहे.

बांधकाम व्यावसायिक अतुल वसंत सोमणी (वय ५९ रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी) यांची दोन कोटी २१ लाखांची फसवणूक झाली असून त्यांच्या फिर्यादीवरून अजयकुमार बाळासाहेब जगताप, बाळासाहेब गंगाधर जगताप, जयश्री बाळासाहेब जगताप, तेजश्री बाळासाहेब जगताप, रूपाली विजय मुनोत, दिपाली विजय मुनोत, मनोज जगताप (सर्व रा. गोकुळनगर, सावेडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लिओ हॉलीडेस टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या नावाने नोंदणीकृत कंपनी नगरमध्ये असल्याचे अजयकुमार जगताप व इतरांनी सोमणी यांना सांगितले. एअरलाईनमध्ये टिकीट ब्लॉकींगसाठी गुंतवणूक करून त्याबदल्यात चांगला फायदा करून देतो, असे सोमणी यांना अमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना कंपनीत गुंतवणूक करण्यात भाग पाडले. सोमणी यांनी कंपनीत दोन कोटी २१ लाख रूपयांची गुंतवणूक केली.

दरम्यान, जगताप व इतरांनी सोमणी यांना ठरल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची रक्कम न देता व मूळ रक्कम परत देण्यास नकार दिला. सोमणी यांनी पैशांची मागणी केली असता अजयकुमार व तेजश्री जगताप यांनी ’आम्ही तुमचे पैसे देऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’, असा दम दिला. सोमणी यांनी आपण केस करू, असे म्हटल्याने तेजश्री व दिपाली यांनी सोमणी यांना धक्काबुक्की व मनोज याने केस केली तर रिव्हॉल्व्हरने तुम्हाला गोळ्या घालू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोमणी यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज केला. त्या अर्जाची चौकशी केल्यानंतर ३ डिसेंबरला तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार पाचपुते यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार : विक्रमसिंह पाचपुते

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा ७० वा वाढदिवस...

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे....

“वाहनांची तोडफोड तर काही नागरीकांना इजा” आता ‘हा’ त्रास तातडीने थांबवा अन्यथा…; विवेक कोल्हे यांनी दिला इशारा, नेमकं प्रकरण काय?

कोपरगाव । नगर सहयाद्री:- शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. ऐन गणेश उत्सवाच्या काळात खरेदीसाठी...

सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि...