अहमदनगर । नगर सहयाद्री-
कल्याण रस्त्यावरील रेल्वेउड्डाणपुलाजवळ रविवारी पहाटे एका १९ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला. मनीषा सुभाष बेलापूरकर (रा. झारेकर गल्ली, नालेगाव) असे मयत युवतीचे नाव आहे. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेनंतर घातापाताचा संशयव्यक्त केला जात आहे.
नालेगाव भागात लेडी डॉन मनी नावाने परिचित असलेल्या मनिषाचा मृतदेह पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी तिला मृत घोषित केले. खबरीवरून तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मनीषा हिच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर काहींनी घातपाताची शक्यताही व्यक्त केली. मात्र, तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. मयत मनीषा ही शनिवारी सकाळी घरातून गेली होती.
त्यानंतर दिवसभरात ती घरी फिरकली नाही. रविवारी पहाटे तिचा मृतदेह आढळला. त्यामुळे तिच्या घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. शविच्छेदन अहवाल काय येतो, याकडे लक्ष लागले आहे.