spot_img
अहमदनगरसुरक्षा रक्षकांकडून 'त्या' टोळीचा पर्दाफाश! नेमकं करायचे तरी काय? वाचा सविस्तर

सुरक्षा रक्षकांकडून ‘त्या’ टोळीचा पर्दाफाश! नेमकं करायचे तरी काय? वाचा सविस्तर

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
तालुयातील वासुंदे येथील कल्पतरु पॉवर ट्रान्समिशन लि. कंपनीचे सुरक्षा रक्षक पेट्रोलिंग करत असताना टॉवरलाईन अल्युमिनियमच्या तारा चोरणारे चौघे जण जेरबंद करण्यात आले आहे. यामध्ये तुषार भाऊसाहेब टोपले, किसन भाऊसाहेब गांगड, सोपान चंदु केदार, रविंद्र सुभाष केदार (सर्व रा. वासुंदे, ता. पारनेर) यांचा सामावेश आहे.

यासंबंधीची फिर्याद किरण दिंगबर म्हसकुले (वय-२५ वर्षे, धंदा खाजगी नोकरी (सुरक्षा रक्षक) रा. पाबळ ता. पारनेर) यांनी दिली असून ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सात महिन्यांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. कपंनीने कल्पतरु पॉवर ट्रान्समिशन लि. कंपनीचे सुरक्षाचे काम घेतले आहे.

सोमवार दि. २७ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सहकारी मयुर बाबाजी शिरतार, दत्ताञय महादु शिरतार, कृष्णा भानुदास शिरतार, अक्षय बाबाजी जेटगुले, रुषीकेश राजेंद्र शिरतार आम्ही सर्वजण पेट्रोलिंग करत होतो. २८ मे रोजी पहाटे ३ वाजता सुमारास आम्ही पेट्रोलिंग करीत वासुंदा परीसरात फिरत असताना वासुंदे गावाजवळील टॉवर नबर १८२-१८३ या टॉवर जवळ आलो असता तिथे अनोळखी चार इसम अ‍ॅल्युमिनीयम तार ही त्याचे कडील असलेले ग्राइंडर व कटरच्या सहयाने तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना दिसले.

आम्हाला पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्ही यांना पकडले. यामध्ये तुषार भाऊसाहेब टोपले, किसन भाऊसाहेब गांगड, सोपान चंदु केदार, रविंद्र सुभाष केदार (सर्व रा. वासुंदे, ता. पारनेर) यांचा समावेश आहे. टॉवरची अ‍ॅल्युमिनियम तार कटरच्या सहाय्याने तोडून स्वतःच्या फायद्याकरीता चोरी करतांना मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर, सहाय्यक फौजदार संदीप मोढवे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील युवा लोकांना मिळणार खुशखबर?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी...

विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी जनसेवा युवा मंचाचे काम – डॉ. विखे पाटील

  शिर्डीत युवकांचा भव्य मेळावा संपन्न शिर्डी : जनसेवा युवा मंच आपले कुटूंब आहे. जात आणि...

गुन्ह्याचा छडा लागला! जीपचालकाने २८ वर्षांच्या तरुणाला संपवल..; पुन्हा जिल्ह्यात काय घडलं..

Ahmednagar Crime News: छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाण्यासाठी एका जीपचालकाने नांदेड येथील व्यक्तीला...