spot_img
अहमदनगरअहमदनगरच्या 'या' गावाची नागालँड पर्यंत चर्चा! 'त्या' कामाचे कौतुक करत नागालँडच्या शिष्टमंडळाची...

अहमदनगरच्या ‘या’ गावाची नागालँड पर्यंत चर्चा! ‘त्या’ कामाचे कौतुक करत नागालँडच्या शिष्टमंडळाची गावाला भेट

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
पिंपरी जलसेन गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान करत आर्थिक झळ सोसत मनाशी खुणगाठ बांधत पाणलोट क्षेत्रात जे काम केले आहे. यात त्यांची असामान्य ताकद दिसुन आली गावातील कामाचे कौतुक करत हीच उर्जा आम्ही सोबत घेत आमच्या भागात काम करणार असे मत नागालँड मधील आलेल्या शिष्टमंडळाने व्यक्त केले.

पिंपरी जलसेन(ता.पारनेर)येथे नागालँड राज्य सरकारच्या जमीन आणि संसाधन पाणलोट क्षेत्र विकास विभागातील शिष्टमंडळाने गावातील पाणलोटक्षेत्र कामे पाहण्यासाठी भेट दिली. गावाच्या वतीने त्यांचा पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

या भेटीत या समुहाने पानी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेमध्ये गावाने केलेले पाणलोट विकास कामे अभ्यासली यात सलग समतल चर, नाला बडिंग, डीप सीसीटी, माती बंधारे, गॅबीयन, विहीर पुनर्भरण आणि मियावाकी जंगल यासारखे गावाने केलेले काम पाहिले.

गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. गटशेती स्पर्धेतील तालुका स्तरीय विजेता रोकडोबा शेतकरी गटाला भेट देऊन या गटाने भेंडी हे पीक कसे विषमुक्त आणले व ते एक्सपोर्ट केलें याबद्दलही जाणून घेतले.

यावेळी गावातील ग्रामपंचायत, तंटामुक्ती समिती, पानी फाऊंडेशन पदधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या समुहात सनी किनोन, गुंभाई लोटा, अचमो नगलु, तेजा, सिमोन, किंकोंग, अल्बन व विक्रम फाटक यांचा समावेश होता.

पिंपरी जलसेन साठी अभिमानाचा क्षण : गीतांजली शेळके
गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासामुळे चांगली प्रगती साधली आहे.वाहुन जाणारे पाणी आम्ही विविध मार्गाने अडविले यामुळे शेती, पिण्याचा प्रश्न चांगला मार्गी लागला. पशुधन वाढले. राळेगण सिद्धी, हिवरे बाजार नंतर गावाचे नाव घेतले जाते ते काम पाहण्यासाठी परराज्यातील लोक येऊन प्रेरणा घेतात हा सर्व ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद क्षण आहे. असे मार्गदर्शक पाणलोट क्षेत्र विकास टिम,संचालक गीतांजली शेळके यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...