पारनेर | नगर सह्याद्री;-
तालुयातील कडूस येथील सुषमा लहानु रावडे यांची अजित पवार गटाच्या पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांच्या माध्यमातून ही निवड करण्यात आली आहे. सुषामा रावडे यांना या नियुक्तीचे पत्र नुकतेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुषमा रावडे या कडूस ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत. त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान पाहून त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यत पोहोचवावेत.
पारनेर तालुयात महिला संघटन मजबुत करण्यात यावे. तसेच नव्याने महिलांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी आणलेल्या योजना राबवाव्यात. यासाठी आपण प्रयत्नशील रहावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात करण्यात आली आहे. सुषमा रावडे यांचे निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे, राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, पारनेर तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, युवक अध्यक्ष भास्कर उचाळे आदींनी अभिनंदन केले आहे.