मुंबई । नगर सहयाद्री
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर आली असून अपघात की घातपात? यांबाबत संशय व्यक्त करत अतुल लोंढे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
अधिक माहिती अशी: भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.
त्यावरुन काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षाला संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल उपिस्थत करत अपघात नसून घातपाताचा प्रयत्न असू शकतो, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.
भंडाराजवळ आमच्या गाडीला एक ट्रकने मुद्दामहुन धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाडी एका बाजूने घासत घासत पुढे गेली. या अपघातामध्ये मला काहीही झालेलं नाही. परंतु गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. जनतेच्या आशिर्वादामुळे मी व्यवस्थित आहे.
– प्रदेशअध्यक्ष नाना पटोले