अहमदनगर | नगर सह्याद्री
जागेच्या वादातून हॉटेल चालकामध्ये तुफान राडा झाल्याचा प्रकार संभाजीनगर महामार्गावरील खोसपुरी शिवारातील घडला आहे. याप्रकरणी दोन्ही हॉटेल चालकांनी परस्पराविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
संभाजीनगर महामार्गावरील खोसपुरी शिवारातील हॉटेल संग्राम मिसळ पेलेसचे चालक नारायण रोहिदास पवार (रा. पंढरीपूल. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमजान रज्जाक शेख, अफसर रज्जाक शेख, बाबा निजाम शेख, मोसीन मुलांनी ( पुर्ण नाव माहित नाही ) सर्व ( रा. खोसपुरी, अहमदनगर) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरी फिर्याद बाबा निजाम शेख (रा. खोसपुरी, अहमदनगर) यांनी दिली असून नारायण रोहिदास पवार (रा. पंढरीपूल. अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे दोघेही हॉटेल चालक आहे. जागेच्या वादातून सदरचा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.