गणेश जगदाळे | नगर सह्याद्री
यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकर्यांनीही शेतीची वेळेवर मशागत करून बाजरी, सोयाबीन, वाटाणा, तूर, मूग व इतर भाजीपाला पिके केली आहेत. सदर पिकांना त्यांची झपाट्याने वाढ होण्यासाठी वरखत म्हणून रासायनिक खतांचा वापर शेतकरी करत असतात. त्यात प्रामुख्याने युरिया खतांची मोठ्या प्रमाणात गरज शेतकर्यांना भासत आहे.
नेमया याच परिस्थितीचा फायदा खत विक्रेते व मोठे व्यापारी लोक घेत असून शेतकर्यांना कृत्रिम तुटवडा दाखवतात. काळ्या बाजाराने युरियाची विक्री होतं असल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही व्यापारी युरिया खताबरोबर इतर खते औषधे बळजबरीने शेतकर्यांना घेण्यास भाग पाडतात. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येऊन भुर्दंड सोसत आहे.
नेमका पेरणीच्या काळात रासायनिक खतांचा तुटवडा जाणवू लागल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. खत दुकानासमोरच तासन तास रांग लावून सुद्धा एक गोणी युरिया मिळत नसल्याने नेमका युरिया जातो कुठे? असा ही सवाल शेतकरी करत असून तालुका कृषी विभागाचे खत विक्रेत्यावर अंकुश राहिला नाही किंवा युरिया विक्रीत तालुयात काहीतरी मोठा झोल होत असल्याच्या ही तक्रारी शेतकरी करत आहेत.
परंतु कृषी विभाग ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते. कृत्रिम तुटवडा निर्माण करून कागद पत्राची सारवासारव करत अनुदान लाटले जात असण्याची ही शयता हुशार शेतकरी बोलत आहेत. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी या विषयावर सध्या तरी बोलायला तयार नसल्याचे दिसत आहे.दोन दिवसात युरियाचा पुरवठा करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अन्यथा शेतकरी तालुका कृषी कार्यालयासमोर आता आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहेत.
शेतकर्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू
पाऊस झाल्यानंतर खतांचा तुटावडा हा शेतकर्याच्या बाबतीत दरवर्षीचाच विषय झाला असून कृषी विभागावर काही कारवाई करत नाही त्यामुळे शेतकर्यांना वेठीस धरून व्यापारी वर्ग शेतकर्यांची लूट करताना दिसत आहे कृषी अधिकार्यांना संपर्क केला तर ते कॉल पण रिसिव्ह करत नाहीत.
– कॉ. बबनराव सालके
(जिल्हाध्यक्ष, भारतीय किसान सभा अहमदनगर)
खतांचा साठा वाढविण्याची गरज
प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा तुटवडा सहन करावा लागत आहे त्यामुळे शेतीमधील उत्पन्न घटनेची शयता असून कृषी विभागाने रासायनिक खतांचा साठा वाढवण्याची गरज आहे. – कैलास शेळके (प्रगतशील शेतकरी, जवळा)