spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : नगरमध्ये धक्कादायक प्रकार; माझ्याशी लग्न कर नाही तर आत्महत्या...

Ahmednagar Breaking : नगरमध्ये धक्कादायक प्रकार; माझ्याशी लग्न कर नाही तर आत्महत्या करेल…

spot_img

अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल
अहमदनगर | नगर सह्याद्री – 
Ahmednagar Breaking :अल्पवयीन मुलीसोबत मैत्रीकरून तिच्याकडे लग्न करण्याची मागणी करणार्‍या तरूणाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोसो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. पियूश सुंके (रा. दातरंगे मळा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

फिर्यादीची पियूश सोबत दोन वर्षापूर्वी ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री झाल्याने ते मैत्रिप्रमाणे बोलत होते. दोन महिन्यापूर्वी पियूश फिर्यादीला ‘तू माझ्यासोबत लग्न कर, तू माझी असून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव’, असे म्हणून वारंवार त्रास देत होता. बोलली नाही तर आत्महत्या करून तुझे नाव घेईल, अशी धमकी दिल्याने फिर्यादीने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.

पोलिसांनी पियूश याला समज दिली होती. मंगळवारी (दि. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास पियूशने  त्याने फिर्यादीकडे लग्न करण्याची, प्रेमसंबंध ठेवण्याचे बोलून तसे केले नाही तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून तुझे नाव घेईल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार पाचपुते यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार : विक्रमसिंह पाचपुते

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा ७० वा वाढदिवस...

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे....

“वाहनांची तोडफोड तर काही नागरीकांना इजा” आता ‘हा’ त्रास तातडीने थांबवा अन्यथा…; विवेक कोल्हे यांनी दिला इशारा, नेमकं प्रकरण काय?

कोपरगाव । नगर सहयाद्री:- शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. ऐन गणेश उत्सवाच्या काळात खरेदीसाठी...

सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि...