Ladki Bahin Yojana: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेवर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं होतं की, अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यानुसार, लाडकी बहीण योजनेसाठी बहिणींची आर्थिक लूट केल्याच्या आरोपावरून हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झालाय.
लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार आणि गरीब महिलांकडून पैसे उकळल्याचं समोर आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंदना म्हस्के नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वंदना म्हस्के गरीब महिलांना लुटत असल्याचं काही महिलांनी तहसीलदारसमोर गाऱ्हाणे मांडलं. त्यानंतर तहसीलदारांनी महिलांचे जबाब घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार गुन्हा दाखल झालाय.