spot_img
अहमदनगरशरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल; भाजप पुन्हा सत्तेवर आल्यावर लोकशाही शिल्लक राहणार नाही...

शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल; भाजप पुन्हा सत्तेवर आल्यावर लोकशाही शिल्लक राहणार नाही…

spot_img

गांधी मैदान येथे लंके यांच्या जनसंवाद यात्रेची सांगता सभा
अहमदनगर / नगर सह्याद्री –
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना लोकसभेसाठी उमेदवारी देऊ नये यासाठी मुंबई येथील उद्योजकाला राज्याच्या महसूल मंत्री यांनी मध्यस्थी घातले होते. या उद्योजकांने मला भेटुन राज्याचे महसूल मंत्र्यांची विनंती पण सांगितली होती. परंतु हा प्रस्ताव धडकून लावत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात लंकेंची उमेदवारी जाहीर केली. लंके यांच्या उमेदवारीची विखे पिता पुत्रांनी धास्ती घेतली असल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अहमदनगर येथील स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी केला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि मित्रपक्षांकडे सत्ता गेली तर लोकशाही व संविधान शिल्लक राहणार नाही. जगामध्ये अनेक ठिकाणी हुकूमशाही नांदताना अनेक हुकुमशहा होऊन गेले. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत हुकुमशाही नव्हती. सत्ताधार्‍यांचा सामान्य माणसांपेक्षा सत्तेवरच विश्वास असल्याने त्यांच्यातील मानवता नष्ट झाली आहे.  त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास लोकशाही शिल्लक राहणार नसल्याची भिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

अहिल्यानगर येथील शहरातील गांधी मैदान येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी खासदार शरद पवार बोलत होते. यावेळी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजीमंत्री आ. अदित्य ठाकरे, आ. रोहीत पवार, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, बाबासाहेब भोस,  शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, योगीता राजळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड.प्रतापराव ढाकणे, आमदार सुनील शिंदे, नगरसेवक योगीराज गाडे, संभाजी कदम, भूषण होळकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, रोहिदास कर्डिले, विक्रम राठोड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार रोहीत पवार यांनी भाषणाच्या प्रारंभीच इंग्रजीत बोलू का, मराठीत बोलू? असा प्रश्न करून भाजपचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांची खिल्ली उडविली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला. यावेळी माजी आमदार निलेश लंके म्हणाले, जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने बहुतांश तालुयात नागरिकांशी संवाद साधताना तेथील प्रश्नांचे गांभिर्य लक्षात आले. गेल्या पाच वर्षात येथील प्रश्न सुटले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. हे प्रश्न सोडविण्यासाठी आणि नगर दक्षिणचे वैभव पुन्हा परत मिळविण्यासाठी मला एकदा मायबापांनी एक संधी द्यावी, असे भावनीक आवाहन लंके यांनी केले.

दरम्यान शुक्रवारी पवार यांच्या उपस्थितीत नगर येथील नंदनवन लॉन येथे महाविकास आघाडीच्या वतीने बैठका झाल्या. टीडीएफ (शिक्षक संघटना), चार्टर्ड अकाउंटंट संघटना, मुस्लिम समाज संघटना, मातंग समाज संघटना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा देणारे विद्यार्थी, उद्योजकांची संघटना, बहुजन क्रांती पक्ष, तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस तसेच विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या् बैठकीत विविध संघटनांनी व संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत कैफियत मांडली.

गेल्या पाच वर्षांत कोणतेही मोठी कामे झाली नाही. संबंधित खासदारांनी कोणतीही ठोस कामे केली नाहीत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके यांच्यासारख्याच उमेदवाराची गरज होती. ती आज पवार यांच्यामुळेच पूर्ण झाली. आता आम्ही सर्व संघटनांनी पवार यांचे हात बळकट करण्याचे ठरविले आहे. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून येईल, अशी ग्वाही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी दिली. पवार यांनी सर्व पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. कोणतेही भाषण न करता त्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे समजावून घेतले. उमेदवार लंके यांनी आभार मानले. फाळके यांनी आभार मानले .

अबकी बार भाजपा हद्दपार ः आदित्य ठाकरे
अबकी बार ४०० पार नसून अबकी बार भाजपा व मित्रपक्ष हद्दपार’ होणार असल्याची टीका करताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा भांडाफोड केला. भारताच्या दक्षिण भागत भाजपाची एकही जागा येत नाही. भाजपाने पक्ष आणि चिन्ह चोरून घरे फोडली आहेत. भाजपा सत्तेच्या काळात पेट्रोल, डिझेल गॅसवाढीच्या महागाईचा भडका उडाल्याने सामान्य माणसाला जीणे नकोसे झाले आहे. महाविकास आघाडीच्या काळात शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. आत्ताच्या सरकारने शेतकर्‍यांना काय दिले? असा सवालही त्यांनी केला. राज्यातील सत्ताधार्‍यांच्या काळात महाराष्ट्रात एकही नवीन उद्योग उभा राहिलेला नाही. याउलट महाराष्ट्रातील अनेक रोजगार देणारे मोठे उद्योग गुजरातच्या घशात नेऊन राज्यातील बेरोजगार तरुणांवर अन्याय केला आहे, असा आरोप माजीमंत्री आ.आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

अहमदनगर | नगर सह्याद्री - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले...

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

पारनेर । नगर सहयाद्री:- खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप पारनेर । नगर सहयाद्री:- श्री. तुळजा भवानी...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा...