अहमदनगर। नगर सहयाद्री
येथील जाहीर सभेत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
८ मे रोजी संजय राऊत यांनी नगरच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे.
ती जी माती आहे तीऔरंगाजेबाची माती आहे, असे बोलून देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी भाषेत उल्लेख करून प्रक्षोभक भाषण करत पंतप्रधान यांना धमकी दिली.तसेच दोन धर्मामध्ये द्वेषाची व वैरत्वाची भावना निर्माण करण्याचा भाषणादरम्यान प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.