अहमदनगर। नगर सहयाद्री
श्रीगोंदा तालुक्यातील वेठेकरवाडी शिवरामध्ये दरोड्याचे तयारीत असलेले तीन रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पकडलेल्या आरोपीमध्ये दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात नगर जिल्ह्याती विविध पोलीस ठाण्यात १६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर यावेळी अंधाराचा फायदा घेत पाच जण फरार झाले आहेत.
याबाबत हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यात चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना आदिक आजगन काळे (रा. म्हसणे, ता. पारनेर ) हा त्याचे इतर 7 ते 8 साथीदारांसह तीन मोटारसायकल वरून वेठेकरवाडी ते पांढरेवाडी जाणारे रोडवरील वेठेकरवाडी शिवारातील ओढयामध्ये थांबुन दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांनी पथकास कारवाईचा सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेनच्य पथकाने वेठेकरवाडी शिवारातील जावून खात्री केली असता काही संशयीत इसम दबा धरून बसलेले दिसले. पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पलुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन शिताफीने ३ इसमांना ताब्यात घेतले. यावेळी पाच जण अंधाराचा फायदा घेउन पळुन गेले.
ताब्यात घेतलेल्यामध्ये आदिक आजगन काळे ( वय 50 ), समीर आदिक काळे वय 22 ( दोन्ही रा. म्हसणे, ता. पारनेर) आकाश रविंद्र काळे वय 21 ( रा. गटेवाडी, ता. पारनेर) असे असल्याचे सांगितले. तर पळून गेलेल्यांमध्ये वारुद भास्कर चव्हाण, कोक्या भास्कर चव्हाण, सतिष भास्कर चव्हाण, अजय संतोष भोसले, सर्व ( रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा ) राहुल अर्पण भोसले,( रा. म्हसणे, ता. पारनेर ) असे असून हे पाच जण फरार आहेत.
यावेळी संशयीतांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांच्याकडे 1 कत्ती, 1 कटावणी, 1 सुरा, मिरचीपुड, 2 मोबाईल फोन व 1 होंडा कंपनीची मोटार सायकल असा एकुण 1 लाख 47 हजार 800 रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. यातील आरोपी आदिक आजगन काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द गंभीर स्वरुपाचे ११ गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर,सूपा आदी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच आरोपी समीर आदिक काळे याच्या विरुध्द खुन, दरोडा तयारी व गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे ४ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे,कर्जत विभाग, पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, अंमलदार बबन मखरे, रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, संतोष लोढे, देवेंद्र शेलार, फुरकान शेख, संतोष खैरे, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, जालिंदर माने, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली आहे.