मुंबई । नगर सहयाद्री
कारखानदारांसह शेतकऱ्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. सरकारने बंदी घातलेल्या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीचा मोठा फायदा होणार आहे.
केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यातील दिडशे साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते होती. मात्र केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ रोजी बंदी घातल्याने साखर कारखान्याना मोठा धक्का बसला होता.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं तब्बल ३८ कोटी लिटरची निर्मिती वाढणार असून केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं इथेनॉल निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.