spot_img
राजकारणLok Sabha Elections 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना ऑफर? शरद पवारांनी...

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना ऑफर? शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर, पहा.

spot_img

Lok Sabha Elections 2024:लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकारणात चर्चांना उधाण आले. यानंतर शरद पवारांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य करत थेट शरद पवारांनाच एनडीएमध्ये येण्याची मोठी ऑफर दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदी यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटावर टीका केली. नकली शिवेसना मला जिवंत गाडण्याची भाषा करते. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना जवळून पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आज किती दु:ख होत असेल, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

यानंतर त्यांनी शरद पवारांच्या विधानावर भाष्य केले. ४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक मोठे नेते राजकारणात आहेत. सध्या ते काहीही भाष्य करत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत असावेत. त्यांनी अनेक चांगल्या लोकांबरोबर काही विचार विनिमय करून त्यांनी ते विधान केले असावे. ४ जूननंतर राजकारणात टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागू शकतं, असं त्यांना वाटलं असेलठ, असंही मोदी म्हणाले. छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केलं आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आमची विचारधारा गांधी, नेहरुंची गांधी, नेहरुंची विचारधारा आमची आहे. हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर सर्व घटकांना सोबत घेऊन हा देश पुढे न्यावा लागेल. एका समाजाबद्दल वेगळे विचार मांंडले तर देशात ऐय राहणार नाही. पंतप्रधान मोदींची भाषणे ऐकली तर ती समाजा- समाजामध्ये गैरसमज पसरवयला पोषक आहेत.

हे देशासाठी घातक आहे. आणि देशासाठी घातक असेल तिथे मी किंवा सहकारी राहणार नाही, असे शरद पवार म्हणाले. आमचे आरक्षण वाढवायला हरकत नाही. मात्र एखाद्या समाजाबाबत राज्यकर्ते अशी कशी भूमिका घेऊ शकतात. पंतप्रधान हे सगळ्यांचे असतात. ते संपूर्ण देशाचे नेतृत्व करत असतात. अशावेळी त्यांनी एका धर्माचे, भाषेचे विचार करायला सुरूवात केली तर या देशातील ऐय संपुष्टात येईल. मगं ते प्रधानमंत्री असो किंवा मंत्रीमंडळातील सदस्य असो, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले होते?
पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील, किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटेल, असे ते म्हाणाले होते. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. मी आता काहीही बोलत नाही. सहकार्‍यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही त्यांच्या (काँग्रेसच्या) जवळ आहोत. पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील, असे सूचक भाष्य शरद पवार यांनी केले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

अहमदनगर | नगर सह्याद्री - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले...

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

पारनेर । नगर सहयाद्री:- खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप पारनेर । नगर सहयाद्री:- श्री. तुळजा भवानी...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा...