spot_img
अहमदनगरआरोग्य क्षेत्रात पंतप्रधान मोदी यांचे मोठे काम, आयुष्यमान भारत योजना ही..: पालकमंत्री...

आरोग्य क्षेत्रात पंतप्रधान मोदी यांचे मोठे काम, आयुष्यमान भारत योजना ही..: पालकमंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा…

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –

आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू आहे. आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी विकास प्रक्रियेचा भाग असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शहरातील दिनदयाळ प्रतिष्ठान परीवार,दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरभी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी पंतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा सुरभी रुग्णालयाचे चेअरमन अनिरूध्द देवचक्के माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पतसंस्थेने सभासदांकरीता सुरू केलेल्या हेल्थ कार्ड योजनेचा शुभारंभ यानिमिताने करण्यात आला.या उपक्रमाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकार्याचे अभिनंदन करून आज आरोग्य सुविधेचा वाढत्या खर्चाचे सर्वात मोठे आव्हान समाजासमोर आहे.यासाठी आयुष्यमान भारत योजना सुरू करून यामाध्यमातून पाच लाख रुपयांपर्यत मोफत उपचार देण्याची अंमलबजावणी होत आहे.राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू त्यामध्येही सर्व अटी काढून पाच लाख रुपयांपर्यत उपचार मोफत देण्यात येतील.यामध्ये काही ग्रामीण भागातील रूग्णालय चालकांनी बेडची अटीमध्ये बदल करण्याच्या केलेल्या मागणीबाबत राज्य सरकार निश्चित विचार करेल असे विखे पाटील म्हणाले.

देशात आज आरोग्य सुविधला विकासाचा भाग बनविण्यात आले असून आरोग्य सुविधेला बळकटी देण्यासाठी मोठी गुंतवणूक होत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इच्छुक अर्धाडझन तरीही श्रीगोंदेकरांमध्ये ‌‘सेटलमेंटचं सेंटीमेंट‌’

बबनराव पाचपुते विरोधकांमध्ये ‌‘भलतीच‌’ स्पर्धा | दबावतंत्रात टेंडर वाढवून घेतलं जात असल्याची जाहीर चर्चा...

नगरकरांना खुशखबर; आमदार संग्राम जगताप यांना नवरात्रात देवी पावली, २० कोटी मंजूर…

सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार...; खोलीकरण व रुंदीकरणासाठी २० कोटी मंजूर अहमदनगर | नगर...

शहर पुन्हा हादरलं! छत्तीसगडच्या अमनला नगरात संपवल; कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- बिगारी काम करणार्‍या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून...

आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, तुळजाभवानी माताकी जय…!; केडगाव, बुर्‍हाणनगरला देवीचा जागर

अहमदनगर । नगर सहयाद्री:- बुर्‍हाणनगर ता.नगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात गुरवारी सकाळी नवरात्रौत्सवानिमित्त...