spot_img
ब्रेकिंगप्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांना सल्ला ; म्हणाले

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांना सल्ला ; म्हणाले

spot_img

मुंबई : नगर सह्याद्री

मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे. ते लढतीलही अशी अपेक्षा असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते आज नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 20 जुलैनंतर 288 जागांवरील उमेदवार पाडायचे की निवडून आणायचे हे ठरवू असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते. यावर आंबेडकरांनी त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.

विशाळगडाचा वादावर आंबेडकर यांनी थेट महाविकास आघाडीला विचार असे म्हणाले. काँग्रेसच्या 7 आमदारांवर क्रॉस वोटिंगचा आरोप केला आहे. तो आरोप चुकीचा असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. राज्यसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना ज्या आमदारांनी पाडले त्यांची नावे काँग्रेसला माहीत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल काँग्रेस पक्षाला प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. काँग्रेस कारवाई करणार का? की त्यांच्यातील मनुवाद पुन्हा बाहेर येणार का असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात देखील प्रसारमाध्यमांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जी परिस्थिती उद्भवणार आहे, त्याबाबत आम्ही कार्यकर्त्याला माहिती देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, पुण्यातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी माझ्याशी संपर्क केला होता. पक्ष सोडताना ते माझ्याशी बोलल्याचे आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी आज नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी फोनवर बोलतानाचे त्यांचे संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ‘मै अभी नांदेड मै हु अशोक चव्हाण को तुम्हारे पास लेके आ रहा हु, नही तो क्या रहा उसमे, तुमने किमा बना दिया उसका’ असे प्रकाश आंबेडकर फोनवर बोलत होते. ते कोणाशी बोलत होते, याबाबतची माहिती मिळाली नाही. मात्र, त्यांचे संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...