अहमदनगर । नगर सहयाद्री-
येथील सावेडी उपनगरातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून राहणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी समोर आली आहे. आई-वडील कामाला गेले की संधीचा फायदा घेत एका नराधमांनी अत्याचार केला. मुलीला त्रास झाल्याने तिची वैद्यकीय उपचार घेतले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी आई-वडिलांबरोबर सावेडीतील पाइपलाइन भागात एका अपार्टमेंटजवळील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती. तिचे आई-वडील वॉचमन म्हणून काम करीत होते.
डिसेंबर २०२३ पासून वारंवार आरोपीने तिचे आई-वडील घरी नसल्याचा फायदा घेत पीडितेवर अत्याचार केला. मुलीला त्रास झाल्याने तिची वैद्यकीय उपचार घेतले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.