spot_img
ब्रेकिंगपंढरीची वारी..भाविकांना टोल फ्री

पंढरीची वारी..भाविकांना टोल फ्री

spot_img

 

 

मुंबई । नगर सह्याद्री
अवघ्या महाराष्ट्राला पांडुरंगाचे वेड लागलं असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्यादिशेने टाळ-मृदुंगाचा गजर करत, मुखी हरीनाम जपत दिंड्या पंढरीकडे निघाल्या आहेत. ऊन, पाऊस, वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊलं टाकत आहेत. तर, एसटी महामंडळानेही हजारो बस पंढरीच्या वारीसाठी सोडल्या आहेत.

याशिवाय खासगी वाहनांचीही मोठी संख्या पंढरपूरकडे ये-जा करत असते. वारीच्या कालावधीत पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा जमतो. कार, बससह विविध वाहनांतून वारकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने चंद्रभागेच्या तिरी जमतात. या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी देण्यात आली आहे. आजपासून 21 जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केला होता. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यामुळे गतवर्षी वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं, त्याचा विचार करून सरकारने गतवर्षी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी केली होती. आता, यंदाही राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला असून आजपासूनच पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

पंढरपूरला आषाढी कार्तिकी निमित्त जाणाऱ्या व परत येणाऱ्या पालख्या आणि वाहनांना पथ करातून सूट देण्यात आली आहे. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टीकर्स दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे 3 जुलै ते 21 जुलै या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या आणि पंढरपूरहून गावी जाणाऱ्या सर्वच वाहनांना ही सवलत असणार आहे. दरम्यान, गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातून पांढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्यांवर उपरोक्त कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही पथकरातून सूट देण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...