मुंबई । नगर सहयाद्री-
एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून देशातील वातावरणात सातत्याने बदल पहावयास मिळत आहे. कुठं अवकाळी पावसाची दमदार सलामी तर कठे उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान खात्याने २० एप्रिलपर्यंत देशातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, १९ एप्रिल ते २१ एप्रिल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. ओडिशातील काही भागातील तापमान ४५ अंशावर जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
तसेच ओडिसा, पश्चिम बंगाल, कोकण, सौराष्ट्र आणि कच्छ, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, ओडिशा या राज्यातील काही भागात येत्या पाच दिवसांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. कुठं उष्णतेचा कहर, तर कुठं अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान, 20 तारखेपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.