spot_img
अहमदनगर५५ वर्षाच्या काळात फक्त अन्याय? क्राँग्रेसच्या जाहिरनाम्यावर खासदर विखे पाटलांची प्रतिक्रया काय?...

५५ वर्षाच्या काळात फक्त अन्याय? क्राँग्रेसच्या जाहिरनाम्यावर खासदर विखे पाटलांची प्रतिक्रया काय? पहा..

spot_img

शेवगाव । नगर सहयाद्री
काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेख असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहिरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली आहे. शिंगोरी गावात बूथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

शेवगाव तालूक्यातील शिंगोरी गावातील बुथ कमिटी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मोनिका राजळे यांच्यासह शेवगाव तालूक्यातील सर्व भाजप पदाधिकारी,बुथ कमिटी मेंबर, गण प्रमुख आणि सुपर वॉरियर उपस्थित होते. यावेळी खासदार विखे पाटील बोलत होते.

खा. विखे म्हणाले, क्राँग्रेसने आपल्या जाहिरनाम्याचे नाव ‘न्यायपत्र’ दिले आहे. जर काँग्रेसला आता न्याय द्यायचा आहे, तर ५५ वर्षाच्या काळात केवळ अन्याय केला आहे का? अनेक दशक देशात काँग्रेसने सत्ता उपभोगली अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहिरनामे प्रकाशित केले. पण आजतयागत त्यांनी आपल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पुर्ण केले नाही. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनाचे गाजर दाखवत लोकांची फसवणूक करण्याचे काम आतापर्यंत काँग्रेस करत आली आहे.

यामुळे हा जाहिरनामा केवळ कागदापूरता मर्यादित असून पुन्हा देशाचे पंतप्रधान हे केवळ नरेंद्र मोदीच होतील, देशात केवळ मोदींची गॅरेंटी टीकू शकणार आहे. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील दहा वर्षाच्या काळात देशाने जगात जे नावलौकीक मिळविले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत असून देशात आर्थिक सुधारणांना गती मिळत आहेत.

मेक इन इंडिया,स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक तयार होत आहेत. त्याच बरोबर उज्वला योजना, वयोश्री योजना, पिएम किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत,प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अशा अनेक योजनाच्या मार्फत सरकार हे शेतकरी, गोर गरीब, महिला आणि तरूणाच्या मागे खंबीर उभे आहे दाखवून दिले. यामुळे अबकी बार ४०० पार होऊन या देशात नवा इतिहास घडणार असल्याचा दावा डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...