नवी दिल्ली
राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून देशभरातील जवळपास ११ ठिकाणी छापेमारी केल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बाँम्बस्फोट प्रकरणात ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. एनआय या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
१ मार्च रोजी बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत भीषण स्फोट झाला होता. याच संदर्भात चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने विविध राज्यांमध्ये छापे टाकले. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी ही छापेमारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या स्फोट प्रकरणात मुसावीर हुसेन शाजीब आणि स्फोटामागील सूत्रधार अब्दुल मतीन ताहा या दोघांना याआधीच अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीवरुन ही छापेमारी केल्याचे सांगण्यात येत आहे. या छापेमारीच्या ठिकाणांबाबत तपास यंत्रणेने गुप्तता पाळली आहे.