spot_img
अहमदनगरविधानसभेसाठी राष्ट्रवादी लागली कामाला; 'यांनी' केले पदाधिकार्‍यांना केले 'मोठे' आवाहन

विधानसभेसाठी राष्ट्रवादी लागली कामाला; ‘यांनी’ केले पदाधिकार्‍यांना केले ‘मोठे’ आवाहन

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीयपक्षांचा जोरदार बैठका सुरू आहे. अजितदादांची राष्ट्रवादी देखील नगर जिल्ह्यात कामाला लागली आहे. नुकतीच राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी विधानसभा निहाय तालुकाध्यक्षांची बैठक घेत कामाला लागण्याच्या सुचना दिल्या.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची आढवा बैठक नुकतीच नगरमध्ये पार पडली. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे व राजेंद्र गुंड, राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्ता पानसरे, ज्येष्ठनेते बाळासाहेब जगताप, जिल्हा युवक अध्यक्ष नंदकुमार मुंडे, अजित कदम, पारनेर महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुषमा रावडे आदी पदाधिकार्‍यांसह सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी विधानसभा निवडणूकीत पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी नव्या पदाधिकार्‍यांना व तालुकाध्यक्षांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

दरम्यान येत्या १५ जुलै पर्यंत दक्षिण भागातील सर्व तालुका पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करून संघटन मजबूत करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखे धडाडीचे नेतृत्व पक्षाल लाभले आहे. भविष्यात त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी नगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील याचे नियोजन करा. नगर शहर राष्ट्रवादी कडे आहेच याशिवाय कर्जत जामखेड, राहुरी, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोला व श्रीगोंदा मतदार संघांची मागणी पक्षाकडे करत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पदाधिकार्‍यांनी सज्ज होऊन आपापल्या भागाचा अहवाल पक्षाकडे लवकरात लवकर सादर करावा, अशा सुचना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी केल्या.यावेळी जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष साईनाथ भगत, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुभाष शिंदे, कर्जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पारनेर तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, दिलीप जठार जामखेड तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, नगर तालुकाध्यक्ष अशोक कोकाटे, पाथर्डी तालुकाध्यक्ष रणजित बेळगे, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, पाथर्डी शहराध्यक्ष धन्यकुमार गुगळे, कार्याध्यक्ष फारुख शेख, जिल्हा सरचिटणीस शौकत सय्यद, राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड, सरचिटणीस नंदकुमार गागरे, देवराम घोगरे सुरज रसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत मोठ्याप्रमाणात जातीय विष पेरले गेले आहे. हा जातीय वाद न थांबल्यास याचा दूरगामी परिणाम होतील. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जास्तीत जास्त जागांची मागणी महायुतीत लावून धरावी. लोकसभा निवडणुकीत त्यामानाने पक्षाला कमी जागा मिळाल्या होत्या. अजित पवारांसारखा खमया नेता आपल्याकडे असल्याचा अभिमान बाळगून त्यांचे हात बळकट करा.
– राजेंद्र नागवडे, प्रदेशउपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रस पार्टी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...