spot_img
ब्रेकिंगनाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुक: कुणाचं पारडं जड ठरणार? 'या' तीन उमेदवारांमध्ये होणार...

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुक: कुणाचं पारडं जड ठरणार? ‘या’ तीन उमेदवारांमध्ये होणार ‘काटे की टक्कर’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजी केली जाणार आहे. त्यामुळे कुणाचं पारडं जड ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी अनेक उमेदवार रींगणात उतरले होते. मात्र काल दि. (दि. १२ जून) रोजी १५ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता या निवडणुकीमध्ये एकूण २१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीत लढण्याचा निर्धार घेतल्यानतंर निवडणुकीमध्ये आता काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले तरी विधान परिषदेची खरी लढत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, महायुतीचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे यांच्यात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी अखेरच्या दिवशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानतंर नगर जिल्ह्यातील विवेक कोल्हे यांच्यासह चार उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार राजा कुणाला पसंती देणार हे महत्वाचे ठरणार आहे.

‘या’ उमेदवारांनी घेतली माघार?
काँग्रेसचेउमेदवार दिलीप पाटील, तसेच अपक्ष उमेदवार राजेंद्र एकनाथ विखे पाटील, भाजपप्रणित अपक्ष उमेदवार धनराज देविदास विसपुते, अपक्ष उमेदवार भास्कर तानाजी भामरे, अविनाश साळी, सुनील पंडित, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, जायभावे कुंडलिक दगडू यांच्यासह आदी एकूण १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना (शिंदे गट) किशोर भिकाजी दराडे, राष्ट्रवादी (अजित पवार) गटा कडून महेंद्र मधुकर भावसार, शिवसेना (ठाकरे गट) संदीप गोपाळराव गुळवे तसेच समता पार्टीकडून भागवत धोंडीबा गायकवाड, तसेच अपक्ष म्हणून अनिल शांताराम तेजा, अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे, इरफान मो. इसहाक (नादिर), भाऊसाहेब नारायण कचरे, विवेक बीपीन कोल्हे यांच्यासह २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाप-लेकाच्या नात्यांचा भयानक शेवट! मुलाने जन्मदात्या बापाला एका क्षणात संपवलं..

Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच...

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील युवा लोकांना मिळणार खुशखबर?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी...

विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी जनसेवा युवा मंचाचे काम – डॉ. विखे पाटील

  शिर्डीत युवकांचा भव्य मेळावा संपन्न शिर्डी : जनसेवा युवा मंच आपले कुटूंब आहे. जात आणि...