spot_img
अहमदनगरमोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझा अनुक्रमांक तीन : डॉ. सुजय विखे पाटील

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझा अनुक्रमांक तीन : डॉ. सुजय विखे पाटील

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तिसऱ्या प्रर्वाची ही वाटचाल सुरू आहे.  याच धर्तीवर मला अनु. क्र. ३ मिळाला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अनु.  क्र. ३ चे बटन दाबा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते नगरमधील एका संवाद सभेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ मे रोजी नगर मध्ये भव्य सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी  ठिकठिकाणी संवाद सभांचा वेग वाढविला आहे. नगर जिल्ह्यातील कामरगाव येथे अशाच संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना डॉ. विखे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या मागील दोन पर्वातील केलेल्या कामामुळे देशात मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा गाढा विश्वास आहे. यामुळे त्यांची तिसऱ्या पर्वाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. आणि हा नियतीचा योगायोग आहे की, त्यांच्या या वाटचालीत मला संधी देण्यासाठी तीन क्रमांकाचे बटन मिळाले आहे. यामुळे आता विजयांची चिंता उरली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकासाच्या रथावर जिल्ह्याचा विकास साधण्याचे ध्येय मी उराशी बांधले आहे. म्हणुन तुम्ही सुद्धा या तिसऱ्या पर्वाचे साक्षिदार होण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश देण्यासाठी अनु क्रं ३ चे बटण दाबावे असे त्यांनी सांगितले. सदर संवाद सभेत जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...