spot_img
ब्रेकिंगखासदार बजरंग सोनावणे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

खासदार बजरंग सोनावणे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

spot_img

बीड । नगर सहयाद्री-
बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाल्याची घटना काल मंगळवार दि. ४ रोजी मध्यरात्री घडली आहे. या अपघातात काहीजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीड लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनेवणे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात धुळे-सोलापूर महामार्गावर घडला आहे. बीड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे काराने मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेली होती.

सोलापूर धुळे महामार्ग शहागड येथे काही मुस्लिम बांधव बजरंग सोनवणे यांचा सत्कार करण्यासाठी थांबले होते. हा सत्कार स्वीकारण्यासाठी बजरंग सोनवणे यांची गाडी शहागड पुलावर बजरंग सोनवणे यांच्या गाडीने ब्रेक लावल्यानंतर त्यांच्या पाठीमागे येणारे फॉर्च्यूनरने ही ब्रेक मारला.

या फॉर्च्युनर मागे चालत असलेल्या स्विफ्ट कारनेही ब्रेक मारला. परंतु ब्रेक मारताना स्विफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि या कारने बजरंग सोनवणे यांच्या गाडीच्या पाठीमागे चालणाऱ्या फॉर्च्युनर गाडीला धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

अहमदनगर | नगर सह्याद्री - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले...

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

पारनेर । नगर सहयाद्री:- खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप पारनेर । नगर सहयाद्री:- श्री. तुळजा भवानी...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा...