spot_img
अहमदनगरमुळा, भंडारदरा परिसरात मान्सून पुन्हा सक्रीय; पाणीसाठा झाला इतका...

मुळा, भंडारदरा परिसरात मान्सून पुन्हा सक्रीय; पाणीसाठा झाला इतका…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

पाणलोट क्षेत्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने आषाढसरी अधूनमधून जोरदार बरसत आहेत. परिणामी ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा शुक्रवारी रात्री ४६ टक्के झाला होता. पाऊस टिकून राहिल्यास आज अथवा उद्या हे धरण निम्मे भरण्याची शयता आहे.

गत पाचसहा दिवसांपासून पाणलोटात पावसाचे प्रमाण घटल्याने धरणाकडे येणारा पाण्याचा ओघ मंदावला होता. पण गुरूवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण काहिसे वाढल्याने काल सायंकाळी संपलेल्या २४ तासांत धरणात ३०९ दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

त्यामुळे सायंकाळी धरणातील पाणीसाठा ५०५१ दलघफू (४५.७६टक्के) झाला होता. रात्री हा साठा ४६ टक्क्यांवर पोहचला आहे. वाकीचा ओव्हरफ्लो सुरू असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठा हळुवार वाढत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा १६०८ दलघफू (१९.३१ टक्के) झाला होता.मुळा पाणलोटातही पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांना हायसे वाटले आहे. मुळा नदीचा विसर्ग ८८६ युसेकवर आला होता. शुक्रवारी कोतूळ येथे सकाळी मुळा धरणाकडे कोतूळ येथून १६३३युसेस तर सायंकाळी १३९३ युसेस पाण्याची आवक सुरू होती. मुळा धरणात अखेर नव्याने ३०४० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली असून मुळा धरणाचा साठा ९००६ दशलक्ष घनफूट (३५ टक्के) झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...