नवी दिल्ली | वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) बहुमताचा आकडा पार केल्याने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसर्यांदा सरकार स्थापन झाले आहे. या नव्या सरकारचा शपथविधी ९ जून २०२४ रोजी पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळात जुन्या चेहर्यांबरोबरच अनेक नव्या चेहर्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाला दिले जाणार यावर चर्चा सुरू झाली आहे. शिवराजसिंह चौहान आणि मनोहरलाल खट्टर यांची नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत होती. पण त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आता कुणाचे नाव समोर येणार याची चर्चा सुरू आहे.
मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्री असतील. यात महाराष्ट्रातील नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचा समावेश आहे. हे दोन्ही नेते यापूर्वीच्याही दोन्ही मंत्रिमंडळात सहभागी होते. नितीन गडकरी हे नागपुरातूनतर पियुष गोयल उत्तर मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले आहेत. अनेक महत्त्वाची खाती या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी सांभाळली असल्याने या दोघांकडे या नव्या सरकारमध्ये कोणते मंत्रालय दिले जाते याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ४ जणांना स्वतंत्र प्रभार देत राज्यमंत्री करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा मिळालीय. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा सहभाग मराज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून मोदी सरकारमध्ये झाला आहे. सध्यातरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकच जागा मंत्रिमंडळात मिळाली आहे. आणि तीही राज्यमंत्रिपद स्तराची. त्यामुळेही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
राज्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्रातून तीन जणांना स्थान मिळाले आहे. रावेरच्या खासदार रक्षा खडसे, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा खासदार रामदास आठवले यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. रामदास आठवले हे यापूर्वीही मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून सहभागी होते. मुरलीधर मोहोळ यांना मात्र खासदारकीच्या पहिल्या कार्यकाळात थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
शपथ घेतलेले मंत्री पुढीलप्रमाणे –
कॅबिनेट मंत्री- राजनाथ सिंह (भाजप), अमित शाह (भाजप), नितीन गडकरी (भाजप), जे पी नड्डा (भाजप), शिवराज सिंह चौहान (भाजप), निर्मला सीतारामन (भाजप), डॉ एस जयशंकर (भाजप), एस. जयशंकर (भाजप), मनोहर लाल खट्टर (भाजप), पियुष गोयल (भाजप), धर्मेंद्र प्रधान (भाजप), सर्वानंद सोनोवाल (भाजप), डॉ. वीरेन्द्र कुमार (भाजप), प्रल्हाद जोशी (भाजप), जुएल ओराम (भाजप), गिरिराज सिंह (भाजप), अश्विनी वैष्णव (भाजप), ज्योतिरादित्य सिंधिया (भाजप), भूपेंद्र यादव (भाजप), गजेंद्र सिंह शेखावत (भाजप), अन्नपूर्णा देवी (भाजप), किरण रिजिजू (भाजप), हरदीप सिंह पुरी (भाजप), डॉ मनसुख मांडविया (भाजप), जी किशन रेड्डी (भाजप), सी आर पाटील (भाजप), एच डी कुमारस्वामी जनता दल (सेक्युलर), राम मोहन नायडू (तेलगू देसम पार्टी), चिराग पासवान (लोक जनशक्ती पार्टी), जितन राम मांझी (हिंदुस्तानी आवाम मोर्चा), राजीव रंजन सिंह जनता दल (युनायटेड).
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)- इंदरजीत सिंह राव (भाजप), डॉ. जितेंद्र सिंह (भाजप), अर्जुन राम मेघवाल (भाजप), प्रतापराव जाधव शिवसेना (शिंदेगट), जयंत चौधरी (राष्ट्रीय लोक दल).
राज्यमंत्री- रक्षा खडसे, (भाजप), मुरलीधर मोहोळ (भाजप), रामदास आठवले (आर.पी आय), जितिन प्रसाद (भाजप), श्रीपाद नाईक (भाजप), पंकज चौधरी (भाजप), कृष्ण पाल (भाजप), नित्यानंद राय (भाजप), व्ही सोमन्ना (भाजप), प्रा. एस पी सिंह बघेल (भाजप), शोभा करंदलाजे (भाजप), कीर्तीवर्धन सिंह (भाजप), बी एल वर्मा (भाजप), शांतनु ठाकूर (भाजप), सुरेश गोपी (भाजप), डॉ. एल मुरुगन (भाजप), अजय टम्टा (भाजप), बंडी संजय कुमार (भाजप), कमलेश पासवान (भाजप), भागीरथ चौधरी (भाजप), सतीश चंद्र दुबे (भाजप), संजय सेठ (भाजप), रवींद्र सिंह बिट्टू (भाजप), दुर्गा दास उईके, (भाजप), सुकांता मजूमदार (भाजप), सावित्री ठाकूर (भाजप), तोखन साहू (भाजप), डॉ.राज भूषण चौधरी (भाजप), भूपतीराजू श्रीनिवास वर्मा (भाजप), हर्ष मल्होत्रा (भाजप), निमुबेन बंभानिया (भाजप), जॉर्ज कुरियन (भाजप), पवित्रा मार्गेरिटा (भाजप), रामनाथ ठाकूर जनता दल (युनायटेड), अनुप्रिया पटेल अपना दल (ड), डॉ चंद्रशेखर पेम्मासानी ( तेलगू देसम पार्टी).