अहमदनगर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यामध्ये गेल्या चाडेचार वर्षात जनतेचे प्रचंड सोशन झाले आहे. तसेच नेत्यांनाही प्रचंड त्रास झाला आहे. त्याचे तीव्र पडसाद आता उमटत आहेत. निकालामधूनच सर्व प्रश्नांचे उत्तरे मिळतील अशी प्रतिक्रीया खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.
बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार विजय औटी यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका जाहीर केली असून महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. औटी यांनी पाठिंबा जाहीर केल्याने खा. विखे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मागच्या एक महिन्यापासून सांगतोय पारनेरमध्ये जनतेचे प्रचंड शोषन झाले आहे. ते फक्त गोरगरिबांपर्यंत मर्यादीत न राहता त्याचा त्रास नेत्यांनाही झाला आहे. त्याचे तीव्र पडसाद आता उमटत आहे. ४ जूनला लोकसभेच्या निकालामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिसून येतील असे त्यांनी सांगितले.