Maharashtra Election Results 2024 Live:
3:26 महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने
राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. राज्यात तब्बल ३० जागांवर महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. राज्यातील उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मतदारांचे आभार मानत शरद पवार यांनी महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने असल्याचे सूचक व्यक्त केले आहे.
3:18 पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 लाख 44 हजार 359 मतांनी आघाडीवर
3:14: प्रणिती शिंदे 31 हजार 580 मतांनी आघाडीवर
02: 24 साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विजयी
2:203 अकोल्यात प्रकाश आंबेडकर पिछाडीवर
2:20 छ. संभाजीनगरमध्ये आठव्या फेरीत संदिपान भुमरे १६ हजार ७४३ मतांनी आघाडीवर
2:14 मा. आ. लंके समर्थकांकडून जल्लोष
अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहे. सुरुवातीला महायुतीचे उमेदवार सुजय विखे हे आघाडीवर होते मात्र दहाव्या फेरी अखेर निलेश लंके यांनी आघाडीमध्ये मुसंडी मारली आहे. दहाव्या फेरीचे निकाल हाती आले असून लंके हे दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. लीड मिळत असल्याने लंके यांच्या समर्थकांकडून पारनेर या त्यांच्या बालेकिल्लांमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला जातो आहे.
01: 56 शिरूरमध्ये अमोल अमोल कोल्हे ५५९४१ मतांनी आघाडीवर
01:56 बीडमध्ये तेराव्या फेरीत बजरंग सोनवणे 6473 मतांनी आघाडीवर
01: 54 सुप्रिया सुळे १० व्या फेरी अखेर ५० हजार मतांनी आघाडीवर..
01:5 पंधराव्या फेरी अखेर नीलेश लंके 15 हजार मतांनी आघाडीवर.
01:48 बजरंग सोनवणे ६४७३ मतांनी आघाडीवर
01: 43 बाराव्या फेरी अखेर नीलेश लंके 9 हजार 500 मतांनी आघाडीवर..
12:01 रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे 25 हजार मतांनी आघाडीवर
11: 49 नाशिकमध्ये नवव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 81,425 मतांनी आघाडीवर
11: 48 सुप्रिया सुळे यांची आघाडी कायम
बारामतीत सुप्रिया सुळे यांनी ७ व्या फेरी अखेरीस २५,३७५ मतांनी आघाडी घेतली आहे.
11: 44: महायुतीचे उमेदवार सुजय विखे नवव्या फेरी अखेर 44 हजार 560 मतांनी आघाडीवर..
11:42 पंकजा मुंडे आघाडीच्या मार्गावर
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंनी त्यांचा फरक असलेली मोठी पिछाडी कमी करण्यात यश मिळवले आहे.
11:38 तिसऱ्या फेरीअखेर नितिन गडकरी 32 हजार 580 मतांनी आघाडीवर
11:36 : महायुतीचे उमेदवार सुजय विखे आठव्या फेरी अखेर 31500 मतांनी आघाडीवर..
11: 34 छ. संभाजीनगर मध्ये संदिपान भुमरे 6 हजार मतांनी आघाडीवर
11: 20 : महायुतीचे उमेदवार सुजय विखे सातव्या फेरी अखेर 22500 मतांनी आघाडीवर..
11:16 शरद पवार आठ जागांवर आघाडीवर
11: 10 अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाचव्या फेरीमध्ये १२३३५ मतांनी आघाडीवर आहे.
10: 58: महाराष्ट्रात कोण पुढे आणि कोण मागे?
महाराष्ट्रात भाजप 12,
शिवसेना (ठाकरे गट) 10
काँग्रेस 9,
राष्ट्रवादी (शरद पवार गट) 8
10: 22: अहमदनगर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ तिसऱ्या फेरीत महायुतीचे उमेदवार सुजय विखे 7160 मतांनी आघाडीवर आहे.
10: 04 : शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर…
वाकचौरे 22976
लोखंडे 20918
रुपवते 6650
9:49 महायुतीचे उमेदवार सुजय विखे आघाडीवर..
राहुरी- विखे 6440,लंके 3862
पारनेर- विखे 2925, लंके 4475
कर्जत जामखेड-विखे 2669, लंके 2013
नगर- विखे 376, लंके 368
श्रीगोंदा- विखे 2013, लंके 2664
शेवगाव-विखे 4021, लंके 4872
9: 25 नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे १९० मतांनी आघाडीवर
नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे पहिल्या फेरीत आघाडीवर आहे. सुजय विखेंना १८४४४ मते तर, निलेश लंकेंना १८२२४ मते आहेत. या आकडेवारीनुसार सुजय विखेंनी १९० मतांची आघाडी घेतली आहे. चार तालुक्यामधून सुजय विखे पुढे आहे तर पारनेर आणि शेवगाव मधून लंके यांनी आघाडी घेतली आहे.
8.55 : शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर…
8: 25 अहमदनगरमध्ये कोण आघाडीवर?
18 व्या लोकसभेत नगर जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व कोण करणार हे आज स्पष्ट होणार आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असणारी धावपळ आज जाहीर होणार्या निकालानंतर संपणार आहे. जिल्ह्यातील मतदार राजाचा पहिला कल समोर आला आहे. त्यानुसार पहिल्या ट्रेंडमध्ये सुजय विखे आघाडीवर.
8.05 नगरमधून लंके की विखे कोण मारणार बाजी
अहमदनगरमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली असून, येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि मविआचे निलेश लंके यांच्यात थेट लढत होत आहे. या दोघांपैकी जनता नेकमी कुणाला दिल्लीत पाठवणार हे दुपारपर्यंत समजू शकणार आहे.
अहमदनगर व शिर्डी लोकसभा निवडणुकीमध्ये चुरशीने झालेल्या मतदानात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे. विखे-लंके यांच्या लढतीप्रमाणेच राज्यातील बारामतीतील पवार विरुद्ध पवार, बीडमधील पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे, शिरुरमधील कोल्हे विरुद्ध आढळराव, चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर, पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रविंद्र धंगेकर, माढात रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशभरात सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. तर महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. अहमदनगर व शिर्डी मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. अहमदनगर मतदानसंघात सुमारे सव्वालाख मतदान गतवर्षीपेक्षा अधिक झाले. त्यामुळे वाढलेल्या मतांचा टक्का कोणाला धक्का देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विखे-लंके समर्थकांकडून जल्लोषाची तयारी
अहमदनगर व शिडी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार शांततेत पार पडली. लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने मतदानाचा टक्का वाढली. मतदान शांततेत पार पडल्यानंतर चौका चौकात आकडेमोड जोरात सुरु असतांनाच मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी विखे-लंके यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यांच्या विजयाचे फ्लेक्स झळकविले. तसेच दोन्ही गटाच्या समर्थकांकडून गुलाल आमचाच अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरवल्या जात असून विजयी जल्लोष करण्यासाठी दोन्ही गटाच्या समर्थकांकडून जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे.
आठ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. 4 जून रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतमोजणी होणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हिएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात किती मतदान?
अहमदनगर- 66.61 टक्के, अकोला- 61.79 टक्के, अमरावती- 63.37 टक्के, औरंगाबाद- 63.03 टक्के, भंडारा गोंदिया- 67.04 टक्के, बीड- 70. 92 टक्के, भिवंडी- 59.89 टक्के, बुलढाणा- 62.03 टक्के, चंद्रपूर- 67.55 टक्के, धुळे 60.21 टक्के,गडचिरोली-चिमूर- 71.88 टक्के, हिंगोली 63.54 टक्के, जळगाव- 58.47 टक्के, जालना- 69.18 टक्के, कल्याण- 50.12 टक्के, मुंबई उत्तर- 57. 02 टक्के, मुंबई उत्तर मध्य- 51. 98 टक्के, मुंबई ईशान्य- 56.37 टक्के. मुंबई उत्तर पश्चिम- 54.84 टक्के, मुंबई दक्षिण- 50.06 टक्के, मुंबई दक्षिण मध्य- 53.60 टक्के, नागपूर- 54.32 टक्के, नांदेड- 60. 94 टक्के, नंदुरबार- 70.68 टक्के, नाशिक- 60.75 टक्के, पालघर- 63.91 टक्के, परभणी- 62.26 टक्के, पुणे- 53.54 टक्के, रामटेक- 61.01 टक्के, रावेर- 64.28 टक्के, सांगली- 55.12 टक्के, सातारा- 57.38 टक्के, शिर्डी- 63.03 टक्के, शिरूर- 54.16 टक्के. सोलापूर- 53.91 टक्के, ठाणे- 52.09 टक्के, वर्धा- 64.85 टक्के, यवतमाळ- वाशीम-62.87 टक्के, बारामती- 53.08 टक्के, कोल्हापूर- 56.18 टक्के, लात्ूार- 63.32 टक्के, मळा- 54.72 टक्के, मावळ-54.87 टक्के, उस्मानाबाद- 62.45 टक्के, रायगड- 56.72 टक्के, रतागिरी- सिंधुदुर्ग- 55.68 टक्के आणि सांगली- 62.84 टक्के.