spot_img
ब्रेकिंगनशीब चमकणार! 'या' राशीसाठी आनंदाची बातमी

नशीब चमकणार! ‘या’ राशीसाठी आनंदाची बातमी

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –

मेष राशी भविष्य

तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर, तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते.

मिथुन राशी भविष्य

प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल.

सिंह राशी भविष्य

आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल.

तुळ राशी भविष्य

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल.

धनु राशी भविष्य

जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्या ही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल.

कुंभ राशी भविष्य

तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरु करण्यासाठी चांगला दिवस आहे. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.

वृषभ राशी भविष्य

आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते ज्या कारणाने तुमचे मन दुखी होऊ शकते आणि तुम्ही बऱ्याच काळ विचार करण्यात घालवू शकतात. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे!

कर्क राशी भविष्य

प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते, फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे. तुम्हाला रोमँटिक गुदगुल्या होतील. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील.

कन्या राशी भविष्य

घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील.

वृश्चिक राशी भविष्य

तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. प्रेम प्रकरण थोडेस कठीण असेल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल.

मकर राशी भविष्य

कुटूंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल.

मीन राशी भविष्य

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. परंतु स्वार्थी व लगेच चिडणाºया व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते – परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार पाचपुते यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार : विक्रमसिंह पाचपुते

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा ७० वा वाढदिवस...

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे....

“वाहनांची तोडफोड तर काही नागरीकांना इजा” आता ‘हा’ त्रास तातडीने थांबवा अन्यथा…; विवेक कोल्हे यांनी दिला इशारा, नेमकं प्रकरण काय?

कोपरगाव । नगर सहयाद्री:- शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. ऐन गणेश उत्सवाच्या काळात खरेदीसाठी...

सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि...