spot_img
महाराष्ट्रविधानसभेसाठी भाजप उमेदवारांची यादी तयार?; कधी होणार घोषणा पहा...

विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची यादी तयार?; कधी होणार घोषणा पहा…

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे यांच्याकडून जोरदार तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेते हे महाराष्ट्राचे दौरे करताना दिसत आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आता लवकरच भाजपची पहिली उमेदवारी यादी समोर येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप हायकमांडच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. ही यादी ३० ते ३५ उमेदवारांची असेल असं बोललं जात आहे. निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच भाजपकडून राज्यातील पहिली उमेदवारी यादी जाहीर केली जाईल, असे बोलले जात आहे.येत्या सप्टेंबर महिन्यात साजरा होणार्‍या गणेशोत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकांची घोषणा करून निवडणूक प्रक्रिया सुरु करता येईल का, याची चाचपणी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सुरु केली जात आहे. महाराष्ट्र विधानसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, नवीन सरकारची स्थापना ही १० ऑटोबर २०२४ पूर्वी करता येईल का, याची सुद्धा चाचपणी केली जात आहे.

दरम्यान महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. त्यापूर्वी हरियाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेनंतर महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही २३ दिवसांच्या अंतराने संपते. त्यामुळे दोन्ही विधानसभांची नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्हीही राज्यांच्या विधानसभा निवडणूक या २००९ पासून एकत्र होत आहेत. त्यामुळे ऑटोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली, तर महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया दीड महिन्यापूर्वी पूर्ण होईल. तर हरियाणाची विधानसभा निवडणूक प्रक्रिया २० दिवस आधीच पूर्ण होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार पाचपुते यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार : विक्रमसिंह पाचपुते

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा ७० वा वाढदिवस...

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे....

“वाहनांची तोडफोड तर काही नागरीकांना इजा” आता ‘हा’ त्रास तातडीने थांबवा अन्यथा…; विवेक कोल्हे यांनी दिला इशारा, नेमकं प्रकरण काय?

कोपरगाव । नगर सहयाद्री:- शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. ऐन गणेश उत्सवाच्या काळात खरेदीसाठी...

सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि...