पारनेर | नगर सह्याद्री
अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे. त्यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघाची जागा आता रिक्त झाली आहे. पण, विधानसभा निवडणुकीला कमी कालावधी राहिला असल्याने तेथे पोट निवडणूक होऊ शकणार नाही.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नीलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. या निवडणुकीचा ४ जून रोजी निकाल लाणार आहे. लंके यांनी कालावधी पूर्ण होण्याआधी राजीनामा दिल्याने त्यांना पेन्शनही मिळू शकणार नाही.
लंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटात होते. पण, लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. पण, पक्ष बदलल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यामुळे अजित पवार गटाचा एक आमदार कमी झाला आहे