spot_img
अहमदनगरलंके समर्थकांचा पतसंस्थेबाबत खोडसाळपणा!

लंके समर्थकांचा पतसंस्थेबाबत खोडसाळपणा!

spot_img

पतसंस्थांच्या विरोधात चुकीच्या पोस्ट टाकल्या | व्हाटसअप ग्रुप ॲडमीनसह पोस्ट टाकणार्‍यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील एक- दोन पतसंस्थांमध्ये चुकीच्या पद्धतीने कारभार झाल्याने सर्वच पतसंस्थांबाबत संशयाचे निर्माण झालेले संशयाचे वातावरण कमी होत असताना व संस्थांचे कामकाजही सुरळीत चालू होत असताना ठेवीदार आणि सभासद यांच्यात संभ्रम निर्माण करणार्‍या पोस्ट सोशल मिडीयात टाकण्याचा खोडसाळपणा नीलेश लंके यांच्या समर्थकांकडून केला जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पतसंस्थेचे नाव टाकत त्या संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन आणि संचालक यांच्या नावाने टाकल्या गेलेल्या या पोस्टशी संस्थेचा अथवा संस्थेशी निगडीत कोणाचाही संबंध नसल्याचा खुलासा सेनापती बापट पतसंस्थेचे चेअरमन रामदास भोसले यांनी केला आहे. संस्थेशी संबंधीत पोस्ट ज्या व्हाटसअप ग्रुपवर टाकली त्या ग्रुपचा अ‍ॅडमीन आणि पोस्ट टाकणारा व्यक्ती अथवा त्याचा मोबाईल नंबर या सर्वांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे संस्थेचे चेअरमन रामदास भोसले यांनी सांगितले. ठेवीदार आणि सभासद यांचा संस्थेवर पूर्ण विश्वास असून अशा विघ्नसंतोषी मंडळींना आता ठेवीदार, सभासद आणि खातेदार हेच जागा दाखवतील असा विश्वास रामदास भोसले यांनी व्यक्त केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, सोशल मिडीयावर सोमवारी दुपारनंतर सेनापती बापट पतसंस्थेशी संबंधीत एक पोस्ट व्हायरल झाली. ‘संस्थेच्या ठेवी देण्याबाबत अडचण निर्माण झाली होती. आता दि. ७ मे पासून संबंधीत शाखांमधून आपली ठेव काढून घ्यावी अथवा नव्याने ठेव ठेवावी’, असा आशय असणारी ही पोस्ट होती. पोस्टच्या शेवटी चेअरमन, व्हा. चेअरमन, महाव्यवस्थापक, सेनापती बापट पतसंस्था, मुख्य कार्यालय पारनेर असे टाकण्यात आले आहे. दरम्यान, संस्थेबाबत कोणीतरी पोस्ट टाकल्याची माहिती मिळताच संस्थेचे चेअरमन रामदास भोसले यांनी लागलीच याची दखल घेतली.

राजकीय खोडसाळपणातून ही पोस्ट टाकली असल्याची त्यांची खात्री पटली. संस्थेचे संस्थापक माजी आमदार विजय औटी व आम्ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय निर्णय घेतला. हा निर्णय विरोधकांना भावला नाही आणि त्यांनी संस्थेच्या बाबत संभ्रम निर्माण होईल यासाठी ही पोस्ट टाकली असल्याचे रामदास भोसले यांनी म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी चेअरमन रामदास भोसले यांच्या फिर्यादीवरुन पारनेर ता. पत्रकार परिषद या व्हाटसअप ग्रुपचा अ‍ॅडमीन आणि पोस्ट टाकणार्‍या दोन व्यक्ती (मोबाईल नंबर ९०२८२०११५३ आणि ८७९६१०६५४१) यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे पारनेर पोलिसांनी सांगितले.

पतसस्थांच्या बाबत दुटप्पी भूमिका अन् त्यातूनच बदनामीची सुपारी!
साडेचार वर्षापूर्वी ज्या पतसंस्था चालकांनी विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केले त्यांच्या विरोधात बदनामी आणि वातावरण, संभ्रम निर्माण करण्याचे काम करण्यात आले. पतसंस्था चालल्या पाहिजेत अशी भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे पडद्याआड त्या पतसंस्था बंद कशा पडतील यासाठी बदनामीची मोहीम राबविण्याची दुटप्पी चाल सध्या चालू असल्याची चर्चा चालू आहे. राजकारणातून तालुक्यातील काही पतसंस्थांच्या विरोधात यापूर्वीही अशाच पोस्ट टाकण्यात आल्या आणि त्या संस्था बंद पाडल्याचे पाप आजच्या पोस्ट टाकणार्‍यांच्या पाठीशी असणार्‍यांच्या माथी असल्याची चर्चा ठेवीदार आणि सभासद यांच्यात आहे.

ग्रुप अ‍ॅडमीनसह पोस्ट टाकणार्‍यांवर एक कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा!
सेनापती बापट पतसंस्थेशी कोणताही संबंध नसताना त्या संस्थेचे पदाधिकारी असल्याचे भासवत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांनी तसेच त्या व्हाटसअप गु्रुपच्या अ‍ॅडमीनने संस्थेची आर्थिक बदनामी केली आणि ठेवीदार- सभासद यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण केल्याने पारनेर ता. पत्रकार परिषद या व्हाटसअप गु्रपच्या गु्रप अ‍ॅडमीनसह तीघांच्या विरोधात नगरच्या कोर्टात एक कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असून याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली असल्याचे संस्थेचे चेअरमन रामदास भोसले यांनी सांगितले. दरम्यान, सहकार मोडीत काढणार्‍या आणि संस्थांना राजकीय आकसातून बदनाम करण्याची सुपारी घेणार्‍या व या प्रवृत्तींना पाठीशी घालणार्‍या त्यांच्या नेत्यांचा बंदोबस्त आता कायदेशिर आणि न्यायालयीन लढाईतून केला जाणार असल्याचे रामदास भोसले यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...