मुंबई। नगर सहयाद्री-
गेल्या पाच वर्षांत राजकारण वेगळ्याच वाटेवर येऊन ठाकले आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतल्यानतंर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीचं बळ वाढलं आहे. मात्र अजित पवार सध्या निवडणुकीनंतर एकत्र येण्याचे संकेत देत आहेत.
भविष्यात जर अजित पवार तुमचे पाय धरण्यास येतील, पण तुम्ही धरू देऊ नका. कारण, तुम्ही त्यांना पाय धरू द्याल आणि आम्हाला येथून बाहेर काढाल. त्यामुळे तुम्ही त्यांना जवळ न घेण्याचा शब्द आम्हाला द्या असे साकडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष पवार यांना घातले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लोकसभा निवडणुकीनंतर एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ही चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका विधानामुळे सुरू झाली आहे.