पारनेर ।नगर सहयाद्री-
तालुक्यात वाढते अवैद्य धंदे रोखण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीने पारनेर तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे यांनी पारनेर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, तालुक्यातील सुपा, निघोज, टाकळी ढोकेश्वर, वाडेगव्हाण या गावांत व परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळु तस्करी, जुगार, मटका, अमली पदार्थाची विक्री, अवैध दारु विक्री व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर राजरोजसपणे सुरु आहेत. सदर अवैध धंदे चालकांना कायदयाचा कोणताही धाक राहिलेला नाही.
सदर अवैध धंदे चालक हे मनगटशाहीच्या व पैशाच्या जोरावर सदर अवैध धंदे हे राजरोजपणे सुरु आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यात मोठया प्रमाणावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. असे निवेदनामध्ये म्हटले असुन अवैध धंदे चालकांवर त्वरीत कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे यांनी दिला आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे, तालुका उपाध्यक्ष राजेश साठे, पारनेर शहराध्यक्ष प्रदीप नगरे, तालुका उपाध्यक्ष किरण गुट्टे, तुषार साळवे, किशोर बागुल, गुलाब साळवे, आदेश गायकवाड, सहदेव साळवे, पुनित आल्हाट, नुर शेख, जिवन घंगाळे, आदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पदाधिकारी उपस्थित होते.