spot_img
अहमदनगरमाझ्याकडे विकासकामे, समोर फक्त दहशत!! खासदार विखे यांचा लंके यांना टोला

माझ्याकडे विकासकामे, समोर फक्त दहशत!! खासदार विखे यांचा लंके यांना टोला

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
दहा वर्षे मुख्यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्ह्यासाठी एकही काम जेष्ठ नेते करु शकले नाही आता त्यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. माझ्याकडे सांगण्यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फत दहशत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

पारनेर येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथ प्रमुखांच्या संवाद कार्यक्रमात खा. डॉ. विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते खिलारी गुरुजी, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनात कोरडे, काशिनाथ दाते, तालुका अध्यक्ष राहुल शिंदे उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, देशात पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर येणार आहे. परंतू ज्यांनी फत राज्यात दहा उमेदवार उभे केले आहेत असे जेष्ठ नेते मोठमोठे स्वप्न पाहत आहेत. असा टोला लगावून ज्यांच्या मतदार संघातील साठ टके निधी परत गेला अशा खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळतो हे आश्यर्चकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

या तालुयातील दहशत आता जनताच संपवेल असा विश्वास व्यत करुन, माझ्याकडे सांगण्यासाठी फत विकासकामे आहेत. इतरांसारखी गुंडगीरी आणि दहशत नाही, मागील पाच वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ मी सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत. कोणी कितीही धमया दिल्या तरी, आपण त्याला घाबरत नाही. या तालुयातील जनताच या धमयांना आता उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला.

ही निवडणूक फत विकासाच्या मुद्याची आहे. परंतू केवळ विरोधासाठी काहीजन एकत्रित आले आहेत. ज्यांचे नेतृत्व घेवून समोरचे उमेदवार उभे आहेत. त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले हा प्रश्न उपस्थित करुन, अनेक वर्षे राज्यात मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्रीपद भोगणा-यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही योगदान दिलेले नाही. संरक्षण मंत्री असतानाही के.के रेंजचा प्रश्न सोडविला नाही.

जिल्ह्यातील माजी महसूल मंत्री यांनीही के.के. रेंजच्या जमीनींबाबत ठाम भुमिका घेतली नाही. मात्र राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री झाल्यानंतर के.के. रेंजला जमीन देणार नाही असे ठामपणे लिहून दिले. त्यामुळेच शेतक-यांच्या जमीनींना संरक्षण मिळू शकले याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...